नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपणार. शक्तीकांत दास यांची डिसेंबर २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०१४ रोजी संपला. त्यानंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ म्हणून शक्तिकांता दास, आयएएस (निवृत्त) (तामिळनाडू १९८०) यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी होईल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल ते संपणार आहे.