नक्षलवाद्यांकडून भामरागडमध्ये माजी पं.स.सभापतींची हत्या

0

गडचिरोली : भामरागड तालुक्यात माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असुन तालुक्यातील कियर येथील भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची रविवारी (२ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास माओवाद्यांनी गळा दाबून हत्या केली. प्राप्त माहितीनुसार शनिवार (ता. १) रात्री ११ वाजताच्या सुमारास काही माओवाद्यांनी कियर गाव गाठून सुखराम मडावीला घरातून गावाबाहेर नेले. गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राऊंडवर त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे यावेळी माओवाद्यांनी त्यांचे तोंड बांधून फाशी लावून मारल्याचे बोलले जात आहे.

मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात माओवाद्यांनी खोटा आरोप केला आहे की सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते. त्यांनी परिसरात पेनगुंडासारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती आणि पोलिसांना माहिती पुरवत होते. अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या वर्षातील माओवाद्यांकडून करण्यात आलेली ही पहिलीच सामान्य नागरिकाची हत्या आहे. गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech