मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताच बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात झालेली अटक झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नाशिकमध्ये मध्ये मोठी घोषणा करत राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत. अशातच मुंबई माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात झालेली अटक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेत, त्यामुळेच आता ते विधानसभा निवडणूक २०२४ कडे वळले असल्याचे चित्र जवळ जवळ स्पस्ट झाले आहे. संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास 8 वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करुन या कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता.
संजय पांडे हे राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी स्वत: नाशिकमध्ये चार उमेदवारांची घोषणाही केली. तसेच त्यांनी मी स्वत: मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. “विधानसभा निवडणुकीसाठी माझी समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित जागांवर उमेदवारी देण्याबद्दलही चाचणी सुरु आहे. त्याबद्दल लवकरच घोषणा करु”, असेही संजय पांडे म्हणाले.