वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बूश यांनी आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली असून ते तटस्थ राहणार आहेत. कमला हॅरिस किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी कोणाच्याही प्रचारात भाग घेणार नाहीत .राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रचार आता शिगेला पोहोचला आहे.अनेक माजी राष्ट्राध्यक्षांनी कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा दिला आहे.मात्र बूश यांनी २०१६ प्रमाणेच तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. न्युयॉर्क टाईम्स आणि सेएना महाविद्यालयाने घेतलेल्या एका सर्वेक्षणात दोघांनाही जवळपास सारखीच पसंती लाभली आहे. ट्रम्प यांना ४७ टक्के लोकांनी पसंती दिली असून कमला हॅरिस यांना ४८ टक्के लोकांनी आपली पसंती दिली आहे. त्यामुळे प्रचारात तरी दोघांचेही पारडे सारखेच असल्याचे म्हटले जात आहे. कमला हॅरिस यांना अनेक बाबतीत लोकांनी पसंती दिली असून त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती इंटरनेटवर सर्च केली जात आहे.