अमरावती – अमरावती शहरातील आयपी अॅड्रेसवरून फेसबुक व इंस्टग्रामवर चार बालकांचे पोर्न व्हिडीओ अपलोड झाले असल्याचा धक्कादायक अहवाल दिल्ली येथील एनसीएमईसी (नॅशलन सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्प्लोईट चिल्ड्रेन) केंद्राने पोलिस आयुक्त कार्यालयात पाठविला आहे.त्यानुसार पोलिस आयुक्त कार्यालयातील – सायबर सेल पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या – प्रकरणात चार गुन्हे दाखल झाले आहेत.
माहितीनुसार दिल्ली येथील एनसीएमईसी (नॅशलन सेंटर फॉर मिसिंग – अॅण्ड एक्प्लोईट चिल्ड्रेन) हे केंद्र थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गतहरविलेल्या मुलांचा शोध घणे आणि त्यांचे सर्व प्रकारचे शोषण थांबविण्याचे काम करते. म्हणूनच कोणत्याही पोलिस ठाण्यात लहान मुलगा किंवा मुलगी हरविल्याची तक्रार आली तर पोलिस सर्वात आधी एनसीएमईसीच्या वेबसाईटवर हरविलेल्या बालकांचीमाहिती अपलोड करतात. सध्याघडीला सोशल मिडीया, फेसबुक, इंस्टाग्राम, युटयूबवर शॉर्ट व्हिडीओ अपलोड करण्याचा धुमाकूळ सुरू आहे. अशातच जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट मिळविण्यासाठी नादात अश्लिल शॉर्ट व्हिडीओ अपलोड करण्याची होडही सुरू झाली आहे. कित्येक मुल-मुली स्वतःचेच इन्टिमेट सीनचे व्हिडीओ अपलोड करतात. तर नराधम आरोपी लहान मुले-मुलींची पोर्न व्हिडीओ अपलोड करतात.
केंद्रीय एनसीएमई सी संस्थेतील सायबर युनिट सोशल मिडीयावर अशा प्रकारचे व्हिडीओंचा शोध घेतात आणि कोणत्या आयपी अॅड्रेसवरून तो व्हिडीओ अपलोड करण्यात आले याचा तपास करतात सदर चे व्हिडीओ ९ मे २०२१, ६ मे २०२१, २६ जानेवारी २०२१ व १९ जानेवारी २०२१ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत चौघांच्या आयपी अॅड्रेसवरून प्रसारित झाल्याची माहिती दिल्ली येथील एनसीएमईसी (नॅशनल सेंटरफॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन) यांच्या चाइल्ड पोर्नोग्राफी टिपलाइननुसार शहर पोलिस आयुक्तालयाला देण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.