ठाणे : १५ वर्षे एका माणसाला संधी दिली त्याचा वाईटट अनुभव घेतलात आता कळवा मुंब्र्यातील विकास कामांसाठी मला एकदा संधी द्या काम करणारा माणूस आहे, कामच माझी ओळख आहे.माझ्या वचननाम्यानुसार १०० टक्के कामे मी करणार, अवघ्या ३ महिन्यात कळवा मुंब्र्यात २०० कोटींची कामे केली आता तरउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवा मुंब्र्याच्या विकास कामांसाठी ३ हजार कोटींची घोषणा केली आहे. यामुळेच मला निवडून द्या मी संधीचे सोने करुन कळवा मुंब्र्यातील परिसर विकास कामांनी उजळवून टाकेन. देवाने दिलेली शक्ती, बुद्धी याचा उपयोग इथल्या लोकांच्या विकासासाठी करेन. महापालिकेची कामे आयती कामे असतात, कळवा मुंब्र्यात सुविधांची गरज आहे ते गेले १५ वर्षात झालेले नाहीत मी वर्षापूर्वी आल्यावर संपूर्ण परिसर फिरलो, लोकांशी बोललो, डीपीप्लॅन काढला, माहिती घेतली, मी आल्यावर लोकांमधील भिती नाहीशी झाली आहे. एक सक्षम पर्याय मिळाला आहे. यामुळे येत्या २० तारखेला घड्याळासमोरील दोन नंबरचे बटन दाबून मला विजयी करा,असे आवाहन मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी २००९ पासून आजपर्यंत गेल्या १५ वर्षाच्या आपल्या कार्यकाळत शासनाकडून किती निधी आणला, याचे पुरावे द्यावेत, याची श्वेत पत्रिका त्यांनी जारी करावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवा मुंब्र्याच्या विकास कामांसाठी ३ हजार कोटींची घोषणा केली आहे. यामुळेच मला निवडून द्या मी संधीचे सोने करुन कळवा मुंब्रा परिसर विकास कामांनी उजळवून टाकेन, अशी घोषणा मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे, माझे सहकारी नगरसेवक व मी नगरसेवक असताना कळवा मुंब्र्यातील नागरी विकास कामांना महापालिकेतील अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मंजुरी मिळाली आहे. मंजुरी देणाऱ्यांना कामाचे श्रेय मिळायला हवे पण जितेंद्र आव्हाड यांनी, मी आमदार मीच श्रेय घेणार, हा अहंकार जपला. नारळ फोडला, पत्रकार, परिषद घेऊन जाहीर केले म्हणजे विकास त्यांनी केला असे होत नाही.
महापालिकेतील शिवसेनेची सत्ता असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व महापालिककेच्या माध्यमातून कळवा मुंब्र्यातील नागरी विकास कामांसाठी २०० कोटींचा निधी मी आणला. मी निवडून आल्यावर कळव्यातील रहिवाशांसाठी तातडीने क्लस्टर योजना आणणार. आजपर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करून चांगल्या सुसज्ज इमारती विकसित करणार. कळव्यातील विटावा येथे प्रथम क्लस्टर योजना सुरु केली जाईल. विटाव्याजवळ आयटी कंपन्या असल्यामुळे येथे आयटी हब चालू केले जाईल, यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. दिघा स्टेशन जवळ असल्यामुळे आयटी हब साठी चेंदणी कोळीवाडा येथून थर्ड ब्रीज कनेक्टिव्हिटी विटावा येथे दिले जाईल, असेही यावेळी बोलतांना सांगितले.
येथिल आयटी हबमुळे इथली कमर्शियल व्हॅल्युएशन वाढेल. व्हॅल्युएशन वाढले तर क्लस्टर योजना फिजिबल होणार. जितेंद्र आव्हाड १५ वर्ष आमदार आहेत, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक १५ वर्ष आहेत पण कळव्याच्या पुढे मनिषानगर येथील पाईपलाईन्स च्या पलिकडे असलेल्या भीमनगर परिसरात रस्त्यांवर डांबर नाही, सौचालय नाही, कचऱ्याचे ढीग साठलेत, अंथाराचे साम्राज्य आहे. जितेंद्र आव्हाड हे अडीच वर्षे गृहनिर्माण मंत्री होते इथे अनेक शासकीय प्लाॅट आहेत त्यावर एकही झोपडपट्टी पुनर्वसन योजना त्यांनी आणली नाही. पण यासाठी लोकांच्या विकासाची मानसिकता लागते, ती त्यांच्याकडे नाही. या परिसरात झोपू योजना आणणार, खारेगाव परिसरात क्लस्टर राबविणार, गार्डन देणार, ट्रॅफिकचा प्रश्न सोडविण्यासाठी आऊटर रिंग रोड करुन ९० फूट व ६० फूट रस्त्यावरून हायवेला सर्विस रोडवरुन ट्रॅफिक डिव्हाइड करणार. डिझाईन तयार आहे आता फिरुन यावे लागते पण पाचच मिनिटात तेथे जाऊ शकतात, ही आमची दूरदृष्टी आहे.
कळवा खारीगाव परिसरात पेट्रोल पंप सुरु करणार, सीबीएसई व आयसीएसई शाळा सुरु करणार, या परिसरासाठी टाक्या बांधून ठेवल्या आहेत पण यात पाणीच नाही. यामुळेच येथे लागणारे ७ एमएलडी पिण्याचे पाणी स्टेम्स, एमआयडीसीतुन आणून पाण्याची क्षमता वाढविणार, कळवा पूर्व भागातील नागरिकांच्या घरावर जाणीवपूर्वक टॅक्स न लावून महापालिकेचे आर्थिक नुकसान तर केलेच पण लोकांना आपल्या धाकात ठेवण्यासाठी अस्थिर केले आहे. कळवा पूर्वचा भाग झोपू योजनेतून डेव्हलपमेंट करणार, येथे स्मशानभूमी- कब्रस्थान देणार, शाळा देणार, हेल्थ सर्विस उभारणार, घोलाई नगर ते भास्कर नगर येथे स्कायवॉक देणार, पिण्याचे पाणी देणार, राजपार्क मधून घोलाई नगर येथे अंडरपास करणार, कळवा खारेगाव अग्निशमन केंद्र, सिगरेटी ट्रॅक व खेळाचे मैदान, स्पोर्ट्स सेंटर उभारणार कळवा मुंब्र्यातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेला टोरन्ट पळवून लावणार, ड्रग्ज मुक्त कळवा मुंब्रा करणार ,शासकीय रिझर्व्ह प्लाॅट डेव्हलप करण्याची करणार. रेल्वे अपघातात सर्वात जास्त मृत्यु कळवा मुंब्र्यातील स्पाॅटवर होतो यामुळेच कळवा मुंब्र्याची कनेक्टिव्हटी वाढविण्यासाठी तळोजामार्गे दिव्यावरुन मुंब्रा कळवा ते कापूरवावडी मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे.लोकहिताच कामे करण्यासाठी व्हिजन लागते, मेहनत करावी लागते, लोकांशी संवाद साधावा लागतो.