सोलापूर : एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना कडाडून इशारा दिला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. त्यानंतर सोलापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी टोलेबाजी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही, असं जयकुमार गोरे म्हणाले. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. नुकतीच जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत तुफान फटकेबाजी केली. देवाभाऊ माझ्या पाठीशी असल्याचेही जयकुमार गोरे म्हणाले.