इंद्राणी मुखर्जीला भारत सोडून जाता येणार नाही- हायकोर्ट

0

मुंबई – बहुचर्चीत शिना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला भारत सोडून जाता येणार नसल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला.यापूर्वी सत्र न्यायालयाने इंद्राणीला परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. याविरोधात सीबीआयने हायकोर्टात अपील केले होते. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणीला परदेशी जाण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. श्याम चांडक यांनी हा निकाल दिला आहे.

इंद्राणी मुखर्जी हिच्यावर तिची मुलगी शिना बोरा हिचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाची ही घटना 2012 मध्ये घडली होती. इंद्राणी मुखर्जीला या प्रकरणी जामीन मिळालेला आहे. त्यानंतर तिने परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. लंडनमधून इंद्राणीच्या वकिलांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मृत्यूपत्रात दुरुस्ती करणे, करासंदर्भातील विषय आणि बँकेतील जॉईंट खाते पुन्हा सुरू करणे अशा कामांसाठी तिला या देशांत जावे लागणार आहे, असे तिच्या वकिलांनी म्हटले होते. इंद्राणीला 3 महिन्यांच्या कालावधीत 10 दिवस लंडन आणि स्पेनमध्ये जाण्याची परवानगी सत्र न्यायालयाने दिली होती. पण सीबीआच्या वकिलांनी सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या निकालावर आक्षेप नोंदवले. इंद्राणी हिला या कामांसाठी परेदशात जाण्याची गरज नाही, कारण यांची पुर्तता ती भारतातून करू शकते, असे वकिलांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech