मुंबई – बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मविआला फटकारले आहे. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंद विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यात न्यायालयाने म्हटले आहे, कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसून जर कोणी तसा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
न्यायालयाने मात्र हे सगळे राजकीयदृष्ट्या प्रेरित असून न्यायालयाला यात ओढू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे, राज्य सरकार सगळी स्थिती हाताळण्यास समर्थ असल्याचे म्हटले. परंतु, आधीचे अनुभव लक्षात घेता न्यायालयाने सर्वसामान्य नागरिकांसाठी याचिका ऐकण्याची आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर योग्य तो निर्णय देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली.’