नाशिकमध्ये शनिवारपर्यंत उष्णतेची लाट राहणार

0

नाशिक – अवकाळी पावसानंतर नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र यानंतर आता अचानक उष्णता वाढली आहे. नाशिकमधील तापमानाचा पारा ४१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तसेच मालेगावमध्ये ४३ व निफाडमध्ये ४०.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नाशिकमधील उष्णतेची लाट शनिवारपर्यंत कायम राहणार असल्याचे आणि या काळात सरासरी किमान तापमान ४० ते ४४ अंशादरम्यान असेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले असून तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असतो. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाचा माध्यमातून करण्यात आले आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech