औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांचा कडक बंदोबस्त

0

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर न हटवल्यास बाबरीप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कबर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) तैनात करण्यात आले असून, १५ पोलीस कर्मचारी आणि २ अधिकारी या भागात सतत गस्त घालत आहेत. कबर परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. तसेच, दोन ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे.

‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर औरंगजेबाच्या कबरीबाबत वाद उफाळला. औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीने वातावरण तापले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत. काही पोलीस साध्या वेशातही नजर ठेवून आहेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी कबरीच्या आतील बाजूची पाहणी केली. बजरंग दलाने स्पष्ट इशारा दिला आहे की, औरंगजेबाची कबर लवकरात लवकर हटवली नाही तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल. तसेच, प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयाबाहेर एकाच दिवशी निदर्शने करण्यात येतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech