पुणे : प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘फुले’ सिनेमाची सध्या चर्चा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारीत हा सिनेमा आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेल्याचं समजतंय. सिनेमासंबंधी जो वाद निर्माण झालाय, त्यामुळे मेकर्सने ‘फुले’ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केलं आहे.
भुजबळ म्हणाले, सिनेमाच्या टीमने मला स्पष्ट सांगितलं की, अशा प्रकारचे सिनेमांमध्ये थोडं स्वतंत्र घेऊन नाही ते पण दाखवले आहे. फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलं आहे. तो सिनेमाचा एक भाग आहे. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असे सांगितले. कर्मठ ब्राह्मण असेल त्यांनी फुले यांना त्यावेळेस विरोध केला, आणि ब्राह्मण देखील महात्मा फुले यांच्यासोबत लढत होते. त्यांना मदत करत होते. शाळा बंद करत होते त्यावेळी लहुजी वस्ताद साळवी यांनी मदत केली. दोन्ही बाजू आहेत. इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे.