नवी दिल्ली – भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने सर्वात घातक क्षेपणास्त्र बनवले आहे. सर्वात भन्नाट वेग असणा-या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात केवळ काही सेकंदात संपूर्ण पाकिस्तान आणि चीन टप्प्यात येणार आहे. आतापर्यंत असे क्षेपणास्त्र फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. हाइपरसोनिक टेक्नोलॉजी डिमॉन्सट्रेटर व्हीकल नावाच्या या क्षेपणास्त्राचा वेग ताशी ६,१२६ से १२,२५१ किलो मीटर आहे. त्यामुळे ते सुटल्यानंतर ते थांबवणे शक्य नाही.
क्षेपणास्त्राचा वेग तासाला ७,५०० किमीपर्यंत आहे. भविष्यात त्याचा वेग अधिक वाढवता येतो. त्यात अण्वस्त्र लावल्यास काही सेकंदात संपूर्ण पाकिस्तान आणि चीन उद्ध्वस्त होऊ शकते. हाइपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा पाच पट वेगाने जाते. त्याचा वेग इतका प्रचंड असतो की, ते ट्रॅक करणेही शक्य नाही. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने युक्रेनवर हाइपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते.