मुंबई – लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाने पहिल्या टप्प्यातील आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. असं असलं तरीही महायुती आणि मविआमध्ये अनेक जागांवरून तिढा कायम आहे. त्यातच महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट यांची कल्याणची जागा भाजपा लढवणार असं म्हटलं जात होतं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच असतील, असं स्पष्ट केलं आहे. यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी फडणवीसांचे आभार मानताना भाजपा कार्यकर्त्यांवर टीका केली आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विषय आधीपासूनच स्पष्ट होता. कल्याणमध्ये युतीचे कार्यकर्ते, नेत्यांच्या बैठका, गाठीभेटींना सुरुवात झाली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळे मिळून एकदिलाने कामाला लागले आहेत. प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे फडणवीसांना माझ्या नावाची घोषणा केल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. कल्याण लोकसभेमधून मी मोठ्या मताधिक्क्याने जिंकून येईन, असा विश्वासही श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.