ऑस्ट्रेलिया- दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्यास सेमीफायनलमध्ये जाणार ‘हा’ संघ

0

लाहोर : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सातव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार होते. मात्र हा सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. जर पाऊस असाच राहिला, तर सामना ड्रॉ होऊ शकतो. रावलपिंडीच्या मैदानावर सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकलेले नाही. या दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर हा सामना ड्रॉ राहिला, तर नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. यासह दोन्ही संघांचे गुण प्रत्येकी ३-३ होतील. जर सामना सुरु झाला आणि निकाल लागला, तर विजयी होणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

ग्रुप बी मधील इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. जर आज होणारा सामना ड्रॉ झाला, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तानला पुढील सामने जिंकून ४ गुणांपर्यंत पोहोचावं लागेल. मुख्य बाब म्हणजे जर या सामन्यात पावसाने खोडा घातला, तर या दोन्ही संघांपैकी एका संघाचं स्पर्धेतून बाहेर पडणं फिक्स आहे.मात्र जर हा सामना ड्रॉ झाला, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांपैकी कुठल्याही संघाने पुढील दोन्ही सामने जिंकले,तर ४ गुणांसह तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. तर ग्रुप ए मध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांनी सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. हे दोन्ही संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech