नेमबाजीत भारताला पहिला; मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास

0

पॅरिस ऑलिम्पिक 2024: नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले

मुंबई – नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरन कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनु भाकरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.

कोरियाच्या नेमबाजाने आघाडी मिळवली. मनू भाकेरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकेर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनू भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनू मागे राहिली. पण तिने भारताला पदक पटकावून दिलं.

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी मनू भाकेरचा १० मीटर एअर पिस्तुलसाठी भारतीय संघात समावेशही नव्हता. गेल्या वर्षी ती हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळली होती, पण या स्पर्धेसाठी ती संघात नव्हती. ही घटना तिच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. एशियाडपूर्वी मनू भाकेरने मागील सर्व वाद विसरून प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशी हातमिळवणी केली, यामागचे एक कारण म्हणजे १० मीटर एअर पिस्तुलमध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करणे. एशियाडनंतर मनूचे समर्पण आणि जसपालची साथ कामी आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech