गाझा पट्टीच्या खळबळजनक वक्तव्यानंतर इराणी खासदाराची ट्रम्प यांना थेट धमकी

0

तेहरान : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीबाबत एक मोठा प्रस्ताव मांडला असून त्यावर आता इराणने तीव्र विरोध दर्शवला आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर इराणच्या संसदेतील परराष्ट्र धोरण आयोगाचे सदस्य मुस्तफा झारेई यांनी थेट धमकी दिली आहे. इराणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्ट करत मुस्तफा झारेई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या बाजूने, मी हे स्पष्ट करतो की जेव्हाही मला संधी मिळेल तेव्हा मी तुम्हाला मारण्यासाठी एक क्षणही मागेपुढे पाहणार नाही.” त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ट्रम्प यांच्या गाझा पुनर्विकासाच्या योजनेवरून हा वाद उफाळून आला आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने त्यांच्या हत्येचा कट रचला होता. या प्रकरणी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात तिघांना अटकही करण्यात आली होती. ट्रम्प यांना मिळालेली ही धमकी यापूर्वीच्या कटाशी संबंधित असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या एका कार्यक्रमात भाषण देताना इराणबाबत कठोर भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, “इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत. जर त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील.” त्यांनी हे देखील म्हटले की, जर इराणने त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला, तर संपूर्ण इराणला जबरदस्त प्रत्युत्तर देण्यात येईल. असं ट्रम्प यांनी म्हंटल होत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech