श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना एक खास भेट देणार आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून ईओएस-8 उपग्रह प्रक्षेपित करेल. या मिशनच्या उद्दिष्टामध्ये देशातील आणि जगभरातील आपत्तींचे निरीक्षण करणे आणि त्याबद्दल सतर्क करणे समाविष्ट आहे. यासंदर्भात इस्रोने सांगितले की, आगामी 15 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून इओएस-8 उपग्रह प्रक्षेपित केला जाईल.
ईओएस-8 मिशनची प्राथमिक उद्दिष्टे सूक्ष्म उपग्रहांची रचना करणे आणि पेलोड उपकरणे तयार करणे आणि भविष्यातील उपग्रहांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करणे आहे. ईओएस-08 सूक्ष्म उपग्रह 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 17 मिनीटांनी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केला जाईल. देश आणि जगाला आपत्तीचा माहिती अवगत होण्यासाठी ईओएस-8 उपग्रह मदत घेतली जाणार असल्याचे इस्त्रोच्या वतीने सांगण्यात आले.
हा उपग्रह एसएसएलव्ही-विकास प्रकल्पांतर्गत आहे. भारतीय उद्योग आणि न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) द्वारे संचालित एक मिशन आहे. ईओएस-08 मध्ये तीन पेलोड आहेत – इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम-रिफ्लेक्टोमेट्री पेलोड, आणि एसआयसी-यूव्ही डोसिमीटर. एसएसएलव्ही-डी-3/बीएल-358 प्रक्षेपण वाहनासह उपग्रह इंटरफेस आहे. तर यामध्ये मिड-वेव्ह आयआर (एमआयआर) आणि लाँग-वेव्ह आयआर (एलडब्ल्यूआयआर) बँड आहेत. ईओआयआर दिवस आणि रात्र दरम्यान मध्य आणि लांब लहरी इन्फ्रारेड प्रतिमा घेण्याची पूर्ण क्षमता आहे.
आपत्ती निरीक्षण, पर्यावरण निरीक्षण, आग शोधणे, ज्वालामुखी क्रियाकलाप इत्यादी क्रियाकलापांचे निरीक्षण करेल आणि सूचना देईल. मिशन दिवस आणि रात्र दोन्ही ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केले आहे. यात ईओआयआरच्या मदतीने इन्फ्रारेड छायाचित्रे काढण्याची क्षमता आहे. या छायाचित्रांमधून देशातील आणि जगातील आपत्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. आपत्तींमध्ये जंगलातील आग, ज्वालामुखीचा उद्रेक, समुद्रातील खळबळ, समुद्राच्या पृष्ठभागावरील वारा, जमिनीतील ओलावा आणि पूर इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये, एसआयसी यूव्ही डोसमीटरने अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन देखील शोधले जाऊ शकते, जे गगनयान मोहिमेत इस्रोला मदत करेल असे इस्त्रोने सांगितले.