सोलापूर : मनसेचे नेते राज ठाकरे आणि बाळासाहेब उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी राज-उद्धव एकत्र येणार असतील तर आम्हाला त्याचा आनंद असल्याचे मत व्यक्त केले आहे. मंत्री प्रताप जाधव शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यासाठी पंढरपुरात आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज -उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येणार असल्याचा चर्चेवर भाष्य केले. दरम्यान असे किती ही लोक एकत्र आले तर महायुतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती मुंबई, ठाण्यासह सर्व महानगर पालिकांच्या निवडणुका पूर्ण बहुमताने जिंकेल असा दावाही मंत्री जाधव यांनी केला आहे.