जपानची 2050 ची तयारी अंतराळात नेणारी लिफ्ट

0

टोकियो – अवकाश संशोधनात दिवसेंदिवस आश्चर्यकारक प्रगती होत आहे. इलॉन मस्क यांच्यासारख्या हुन्नरी उद्योजकाने आत्तापासूनच अंतराळ पर्यटन सुरू केले आहे. त्यातच आता जपानमधील एक कंपनी पृथ्वीवरून थेट अंतराळात नेईल अशी लिफ्ट तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. सन 2050 पर्यंत स्पेस लिफ्ट तयार होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

ओबायशी कॉर्पोरेशन असे या जपानी कंपनीचे नाव आहे. कंपनीचा असा दावा आहे की, स्पेस लिफ्टमधून 40 दिवसांत मानवाला अंतराळात पोहोचविता येणार आहे. ओबायशी कंपनी 2012 सालापासून या महत्त्वाकांक्षी स्पेस लिफ्ट प्रकल्पावर काम करीत आहे. सन 2025 मध्ये ओबायशी कंपनी या प्रकल्पामध्ये 100 अब्ज डॉलर्रची गुंतवणूक करणार आहे. सन 2050 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन मानवाला लिफ्टने अंतराळात पाठविण्यास सुरुवात होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

सध्या पृथ्वीवरून मंगळ ग्रहावर जाण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो. स्पेस लिफ्ट तयार झाल्यास हा प्रवास अवघ्या चाळीस दिवसांत पूर्ण करता येईल, असे ओबायशी कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे. मात्र काही वैज्ञानिक स्पेस लिफ्टसारखा प्रकल्प प्रत्यक्ष साकारणे शक्य नाही, असे म्हणत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech