“जरांगेंच्या निर्णयामुळे, मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल – बच्चू कडू

0

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. कालपर्यंत मनोज जरांगे निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी करत होते, काही मतदारांघांची नावे देखील त्यांनी जाहीर केली होती, पण आता अखेर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूकीत २०२४ मध्ये सरकार विरोधी उतरण्याची घोषणा करून कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे, ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, असे सांगणे, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याशिवाय, निवडणुकीनंतर, सर्वांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू,” असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

बच्चू कडू यांनी माध्यमांसोबत बोलत होते. जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, “खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशिरा केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे. ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनी बोलवूनही दाखवले. एक तर आपण सांगायला हवे होते की, निवडणूक लढणार नाही. आता तुम्ही निवडणुकीचे २५ टक्के, ५० टक्के पार्ट झाल्यानंतर सांगत आहात की आता नाही लढत. यात ज्या कार्यकर्त्यांनी इकडून तिकडून पैसे आणून खर्च केला होता, त्याला आर्थिक झळ बसली असल्याची माहिती देत तीव्र नाराजी व्यक्ती केली .

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech