जेजुरी – पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा येत्या ३० डिसेंबरला होणार आहे. श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
३० आणि ३१ डिसेंबर असा दोन दिवस यात्रेचा कालावधी आहे. या दिवशी जेजुरीत मोठी गर्दी उसळते . त्यामुळे यात्रे दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत . यात्रेकरीता येणारी हलकी आणि इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.:
सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन अन्य मार्गाकडे वळवण्यात येणार आहे . सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुण्याकडे जाण्याकरिता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन या मार्नीगावरील वाहतूक नीरा – मोरगाव- सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येणार आहे.
पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक बेलसर- कोथळे- नाझरे- सुपे- मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात येणार आहे.