नवनिर्वाचित आमदारासह माजी नगरसेवकांची उपस्थिती.
कल्याण : प्रेस असोसिएशन कल्याण डोंबिवली आणि जेष्ठ पत्रकार बापू वैद्य यांचे संयुक्त विद्यमाने आज डोंबिवली येथील प्रसिद्ध फडके गणपती मंदिराच्या सभागृहात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आलं होतं. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील ,कल्याण डोंबिवली महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, डोंबिवली वॉर्ड ऑफिसर हेमा मुबiरकर ,यांच्यासह कल्याण प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णू कुमार चौधरी, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव प्रेस असोसिएशनच्या सचिव सारिका शिंदे, सहसचिव किशोर पगारे डोंबिवली पत्रकार संघाच्या खजिनदार सोनल पवार यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पगारे यांनी केलं यावेळी अनेक पत्रकारांना गौरविण्यात आले यामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद शहाणे , महादेव पंजाबी, छायाचित्रकार अवधूत सावंत, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य प्रशांत जोशी यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांचा समावेश होता.