कळव्यात एमसीएचे रजिस्ट्रेशन केंद्र सुरू

0

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पटूंना एमसीएमध्ये नावनोंदणी करण्यासाठी थेट वानखेडे स्टेडियम गाठावे लागत होते. आता ही अडचण दूर झाली आहे. एमसीएचे सदस्य , आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याने एमसीएचे नोंदणी केंद्र कळव्यातील खारलँड मैदानात सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या मैदानात एमसीएची निवड चाचणी सुरू असून या चाचणीसाठी सुमारे ६०० क्रिकेटपटूंनी आपली हजेरी लावली.

कळवा रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या खारलँड मैदान हे ठाणेकर क्रिकेटपटूंची पंढरी झाले आहे. अनिरुद्ध क्रिकेट अकादमीच्या वतीने या मैदानाचे संचालन करण्यात येत असते. या मैदानात प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनी एमसीएच्या अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. हे मैदान रेल्वे स्टेशनपासून जवळ असल्याने येथे निवड चाचणी घेण्यात यावी, अशी भूमिका डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. त्यानंतर येथे निवड चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या एमसीएचे अधिकृत प्रतिनिधी दर्शन भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार संग्राम शिर्के, नितीन पालांडे, चंद्रकांत भाटकर, कुलदीप यादव, सुशील मापुस्कर आणि समीर मांजरेकर या प्रशिक्षकांच्या उपस्थितीत १४ वर्षाखालील मुले आणि १७ वर्षाखालील मुली यांची निवड चाचणी सुरू आहे, अशी माहिती विरेश तावडे यांनी दिली.

दरम्यान, ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील क्रिकेटपटूंना एमसीएमध्ये आपली नावनोंदणी करावयाची असल्यास थेट मुंबईतील वानखेडे मैदान गाठावे लागत होते. प्रवास आणि इतर बाबींसाठी ते अडचणीचे होते. ही बाब डॉ .जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात येताच, त्यांनी एमसीएकडे पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे खारलँड येथे रजिस्ट्रेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech