तोंड सांभाळून बोला रामदास भाई, दापोली तुमची एकट्याची जहागिरी नाही

0

रत्नागिरी – लोकसभा निवडणुकीनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजप नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी समाचार घेतला आहे. रामदास भाई तोंड सांभाळून बोला, आमच्या नेत्यांबाबत केलेली आक्षेपार्ह विधानं आम्ही खपवून घेणार नाही. दापोली विधानसभा मतदारसंघ ही तुमची एकट्याची जहागिरी नाही, सगळीकडे फक्त मीच असा विषय काही चालणार नाही, असा संतप्त इशाराच भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी थेट पत्रकार परिषदेतून दिला आहे.

“गेले काही दिवस विविध ठिकाणी मुलाखती देताना रामदास कदम हे भाजप नेत्यांवर सातत्याने आक्षेपार्ह विधान करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात दिलेल्या विकास कामाच्या निधीबाबत रामदास कदम टीका करत आहेत. रामदास कदम आम्हाला सातत्याने स्थानिक आमदाराचा हक्कभंग होत असल्याचे सांगत आहेत. मात्र हर्णे येथील केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून बंदराला मिळालेल्या मंजूर विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही घेतलं नाही त्यांचा फोटोही लावला नाहीत त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही फोटो लावला नाहीत मग हा हक्कभंग होत नाही का?” असा खडा सवाल केदार साठे यांनी उपस्थित केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech