मुंबई – भारतात तसेच महाराष्ट्रात कृष्णजन्मोत्सव आणि दही हंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवादरम्यान तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. ह्या वर्षी आपल्या २५व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत झी मराठी सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होतोय, आणि आपल्या प्रेक्षकांसाठी ‘गोविंदा आला रे’ हा खास कार्यक्रम घेऊन येत आहे. हा दही हंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी संपूर्ण झी मराठी कुटुंब एकत्र आलंय. मोठं मोठ्या हंड्या बघण्यासाठी बालगोपाळांची गर्दी होताना आपण पाहत असतो. उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. या दही हंडी जल्लोषाचं आकर्षण असणार आहे एजे-लीलाचा भन्नाट डांस, शिवा-आशु आणि पारू आदित्यचा डान्स ऍक्ट आणि आवडत्या जोड्यांचे मजेदार खेळ.
संकर्षण कऱ्हाडे ‘गोविंदा आला रे’च सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. नायिकांचा मराठामोळा साज तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक वेगळीच चमक आणणार. आणि सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे कृष्ण रूपात कोण असणार तर अप्पीचा अर्जुनाचा मुलगा आणि सर्वांचा लाडका नटखट अमोल बाळकृष्णच्या रूपात येऊन खूप मस्ती करणार आहे.