मंडा टिटवाळ्याच्या रस्त्याच्या कामात नागरिकांच्या पदरात समस्यांची खैरात
टिटवाळा : मांडा टिटवाळा पश्चिम येथे वासुंद्री रोड ते रेल्वे फाटक या मुख्य रस्त्याचे काम चालू असून, त्यामध्ये अनेक समस्या उघडकीस येत आहेत. एम.एम.आर.डी.ए.च्या मार्फत हे काम सुरू असले तरी, कल्याण डोंबिवली महापालिका आणि एम.एम.आर.डी.ए. यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवत आहे.
२०२२ मध्ये १२ कोटी रुपयांची निविदा या कामासाठी काढण्यात आली होती . मात्र २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात होताना ही मंजुरीची रक्क्म १७ कोटींवर गेली आहे .मात्र असे असतानाही ज्या कुशलतेने हे काम व्हायला हवे ते होताना दिसत नसल्याचे पाहयला मिळत आहे .
रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम चालु आहे .पाण्याच्या लाईन लिकेजमुळे पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या टिटवाळाकरांना अधिकच त्रास या कामामुळे सहन करावा लागत आहे .त्याचबतोवर साचलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी चिखल होत असुन घाणीमुळे डासांचा प्रादुर्भावही वाढल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे .
याबाबत एम.एम . आर. डी. ए. कडे विचारणा केली असताना काम करत असताना काही ठिकाणी लिकेज होत असल्याचे मान्य करत सुचना देउन त्या तातडीने दुरुस्ती करण्यात येईल असे सांगण्यात आले .
तसेच पथदिव्यांचे खांब देखील या रस्त्याच्या कामात बाधित होत आहेत . मात्र त्यांना तातपुरते टेकु देउन अक्षम्य हलगर्जीपणा करत ते तसेच दुरुस्ती न करता ठेवले जात आहेत . त्यामुळे या रस्त्यावरुन जात असताना चुकुन कोणाचा या खांबाला स्पर्श झाल्यास दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे .या खांबांच्या तुटण्यामुळे रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था बिघडली आहे, ज्यामुळे रात्री अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
सांडपाण्याच्या गटारांचे झाकण देखील बेफिकरपणा दाखवत उघडे सोडण्यात आलेले आहेत .सकाळी ६:३० च्या दरम्यान या परिसरात शाळेच्या बसेसचा थांबा आहे . अनेक पालक आणि मुलांची यावेळी गर्दी असते . पहाटे अंधुक उजेडात या ठिकाणी अपुरी देखभाल व नियोजनामुळे नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे.
यावर उत्तर देताना एम .एम. आर .डी .ने कामात असलेल्या तृटी मान्य करत तातडीने लक्ष देण्याचे सांगितले असले तरी एखादी दुर्घटना झाल्यावरच उपायोजनेकडे लक्ष देणार का असा संत्पत सवाल नागरिकांकडुन विचारला जात आहे .
एकंदरीतरत कामगारांना आवश्यक तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे कामामध्ये वारंवार चुका होत आहेत. त्यातच हे काम पर्यायी रस्त्यासाठी पालिकेने अद्यापही मंजुरी न दिल्याने धीम्या गतीने सुरु आहे .या कामचा पुर्णत्वाचा कालावधी हा मार्च २०२५ असा सांगण्यात येत असला तरी ,कामाची प्रगती अत्यंत संथ असून, येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे .
नागरिकांची नाराजी: या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्ण कामामुळे वाहतूक कोंडी, अपघात, आणि धुळ यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होत आहेत.
सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे महापालिका व एम.एम.आर.डी.ए.ने नियमित बैठकांद्वारे कामाचे योग्य नियोजन करावे. तज्ञ व प्रशिक्षित कामगारांची नेमणूक कामगारांना आवश्यक तांत्रिक ज्ञान देऊन कामावर तज्ज्ञ नेमावे.
पाणी, वीज, आणि गटार यांचे योग्य स्थलांतर काम सुरू करण्यापूर्वी पाणी आणि वीज पुरवठा लाईनचे व्यवस्थित नियोजन करून स्थलांतर करावे व कामाची गती वाढवणे काम पूर्ण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ आणि साधनांचा वापर करावा.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात ,उघड्या झाकणांवर झाकपाट्यांची तात्काळ व्यवस्था करणे, तसेच खांब दुरुस्त करणे गरजेचे आहे.हे सर्व उपाय वेळेत केले तरच येथील नागरिकांना दिलासा मिळू शकेल. प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. अश्या प्रतिक्रिया नागरिकांतुन उमटत आहेत .
रिपोर्टर अजय शेलार…टिटवाळा.
९८१९८ ८११७२
.