निर्यातीचा लाखो टन कांदा विविध ठिकाणी अडकला

0

नाशिक – सरकारी काम आणि बारा महिने थांब याचं उदाहरण आता शेतकऱ्यांना बघावयास मिळाले असून निर्यात बंदी हटविण्याचा संदर्भामध्ये घेतलेला निर्णय हा सिस्टीम अपडेट नसल्यामुळे लागू झालेला नाही म्हणूनच लाखो टन कांदा हा विविध भागांमध्ये अडकून पडलेला आहे. जर येणाऱ्या काही दिवसांमध्ये यावर तोडगा निघाला नाही तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्यामुळे सत्ताधारी पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही फटका कांद्यामुळे बसू नये यासाठी म्हणून राज्य सरकारने सातत्याने पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून खांद्यावरती लावलेले किमान निर्यात मूल्य पाठविण्यात आले. त्याचबरोबर कांदा हा निर्यात करण्यासंदर्भामध्ये रात्री उशिरा निर्णय घेण्यात आला त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता मात्र हा दावा चुकीचा असल्याचे समोर येत आहे. सरकारने निर्णय घेतला परंतु सिस्टीम अपडेट नाही. त्यामुळे विविध ठिकाणी लाखो टन कांदा हा अडकून पडला आहे.

बांगलादेश सीमेवरती सुमारे 70 ट्रक कांदा हा अडकून पडलेला आहे. तर, मुंबईतील बंदरामध्ये अनेक कंटेनरमध्ये भरलेला कांदा हा अडकून पडलेला आहे. त्याचबरोबर जिथून कांदा निर्यातीला परवानगी मिळतात त्या नाशिक मधील जानोरी या ठिकाणी देखील अनेक ट्रक हे कांद्याने भरलेले असून ते पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घेऊ नये प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे जर येणारा काही दिवसात यावर निर्णय झाला नाही तर हा लाखो टन कांदा चढण्याची प्रक्रिया देखील सुरू होऊ शकते आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech