लाहोर : भारताचा मोठा शत्रू आणि लष्कर-ए-तैयबाच्या या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबु कताल सिंघी याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. या दहशतवाद्याची हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केली असून, हा हल्ला शनिवारी(दि. १५) रात्री घडला.दहशतवादी संघटनेचा एक महत्त्वाचा सदस्य अबू कताल सिंघी हा जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांचा कट रचल्याबद्दल ओळखला जात होता. तो काश्मीरमधील रियासी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.
अबु कताल सिंघी याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पंजाब जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी अबु कताल सिंघी याची गोळ्या घालून हत्या केली.ही घटना शनिवरी(दि. १५) ८ वाजता घडली. पाकिस्तानमध्येच अबु कताल सिंघीची हत्या झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा हल्ला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केला असून, पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप उघड केलेले नाही. मात्र, अशा प्रकारे एका मोठ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानातच खात्मा होणे, ही एक मोठी घटना मानली जात आहे.
अबू कताल हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा भाचा होता. कताल हा लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख सदस्य होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांचा कट रचल्याबद्दल ओळखला जात होता. गेल्या वर्षी ९ जून रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यातही कतालचा सहभाग होता. यामध्ये १० जणांना आपला जीव गमवावा लागला.
अबु कताल हा भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरला होता. २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे झालेल्या हल्ल्यातही त्याचा मोठा सहभाग असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या(NIA) च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.याशिवाय यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आणखी तीन दहशतवाद्यांचा समावेश होता.या हल्ल्यांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला, ज्यात दोन मुलांचा समावेश होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्याच्या मृत्यूमुळे भारतावरील संभाव्य दहशतवादी हल्ल्यांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.