आ. केळकर यांची या उपक्रमाच्या माध्यमातून माता भगिनींना अनोखी भेट..
ठाणे – ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून 1सप्टेंबर रोजी “जनकल्याण कार्ड” योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला. या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादी मध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर 15 ते 50 ℅ पर्यंत सुट मिळणार आहे.
आ. केळकर यांनी या “जनकल्याण कार्ड” चे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजन वाडी हॉल मध्ये केले. महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार, उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जवळ जवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्ड चे वाटत करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा चे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्यापारी आघाडीचे मितेश शाहा उपस्थित होते.
आ. केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जनकल्याण कार्ड ची माहिती दिली. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हा आमचा महत्वाचा उद्देश आहे. आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असतो. मुलींना स्वरक्षणाचे धडे देत आहोत. महिलांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहण्याचे काम महिला विकास परिवार करत आहे. दीड हजार च्या वर मुलीना संगणक प्रशिक्षण दिले आहे. पुढील काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्ड चे वाटप करणार असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.