नवी दिल्ली : पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील विजय हा विकासाचा आणि सुशासनाचा विजय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देत असल्याचे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. तसेच आपण एकात्मतेची उंची आणखी उंच करू असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी राज्याच्या जनतेला केले आहे. एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. राज्यातील 288 जागांपैकी 200 हून अधिक जागांवर महायुतीला निर्णायक आघाडी मिळाली आहे. तसेच एकट्या भाजपचा सव्वाशे जागांवरील विजय देखील दृष्टीपथात आलाय. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा देत हा राज्य सरकारच्या सुशासनाचा विजय असल्याचे म्हंटले आहे.