महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा – शंभूराज देसाई

0

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

महापर्यटन महोत्सव २०२५ हा महाबळेश्वर होत असून या २ ते ४ मे या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवास राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी चोखपणे राबवावी. येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. वाहतूक, कायदा व सुव्यवस्था अंत्यत उत्कृष्ट राहील याबाबत काटेकोर दक्षता घ्यावी.

या कार्यक्रमामध्ये यामध्ये हेलिकॉप्टर राईड, लेसर शो, स्वरोत्सव, साहसी उपक्रम, फुड फेस्ट आणि आनंदयात्रा, लहान मुलांसाठी विविध खेळ, कार्निवल परेड, उत्सव महाराष्ट्राचा समृध्द परंपरेचा, किल्ला प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, साहसी व मर्दानी खेळ, टेंटसिटी, ड्रोन शो, योग, वाद्यसंगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बोट प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार असून याबाबत व एकूणच महोत्सवाच्या आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech