मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अन्य राज्यातील काँग्रेसचे नेते आता महाराष्ट्रात खोटारडेपणाचे मायाजाल पसरवायला आले आहेत. कर्नाटकात आताची दिवाळखोरीची स्थिती पाहता निवडणूक काळात काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे राज्याची तिजोरी खाली झाली हेच सिद्ध झाले आहे. कर्नाटकला दिवाळखोरीच्या मार्गावर आणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आदिवासी आणि दलित समाजाच्या प्रगतीसाठी राज्याच्या तिजोरीतील सुमारे दहा हजार कोटींचा निधी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी इतरत्र वळवला आहे. गेल्या अडीच वर्षात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास आणि महिला सन्मान हे भारतीय जनता पार्टीचे ध्येय आहे. त्यानुसारच विकासाची कामे गतीने होत आहेत. विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी केले. भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत इराणी बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला,डॉ.सय्यद जफर इस्लाम,प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान,देवांग दवे आदी उपस्थित होते. एकीकडे विकासाला गती देणारी महायुती तर दुसरीकडे ‘मतासांठी झूठ, सत्तेत आल्यावर लूट आणि देशातील जनतेत फूट’ अशी नीती असणारी महाविकास आघाडीआहे, अशी सडकून टीकाही इराणी यांनी केली.
इराणी म्हणाल्या की,विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अन्य राज्यातील काँग्रेसचे नेते आता महाराष्ट्रात खोटारडेपणाचे मायाजाल पसरवायला आले आहेत. कर्नाटकात आताची दिवाळखोरीची स्थिती पाहता निवडणूक काळात काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे राज्याची तिजोरी खाली झाली हेच सिद्ध झाले आहे. कर्नाटकला दिवाळखोरीच्या मार्गावर आणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आदिवासी आणि दलित समाजाच्या प्रगतीसाठी राज्याच्या तिजोरीतील सुमारे दहा हजार कोटींचा निधी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी इतरत्र वळवला आहे.
राजस्थानात जनतेला भुरळ घालून मते मिळवण्यासाठी काँग्रेसने बेरोजगारांना भत्ता देण्याचे जाहीर केले. पण तिथे ना बेरोजगारांना रोजगार मिळाला ना भत्ता. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत तरुणांचा जोश आणि जनतेचा रोष पहायला मिळाला आणि भाजपाला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. जे नेते हरियाणाच्या निवडणुकीत जिलेबीची फॅक्टरी उघडण्यासाठी इच्छुक होते त्यांना हरियाणाच्या जनतेने चोख उत्तर दिले आहे. पण जे महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी आले त्यांनी हिमाचलच्या जनतेला वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र तिथे बिले वाढवली. प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये देण्याचेही आश्वासनही त्यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात 96 टक्के महिलांना त्यापासून त्यांनी वंचित ठेवले.
मते मिळवण्यासाठी काँग्रेस निवडणुकीच्या काळात खोटे बोलते, नंतर लूट करते आणि देशात फूट पाडते हे कळून चुकल्याने महाराष्ट्रतील जनता या खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही. मोदी सरकारने सर्वांसाठी जनकल्याणाच्या योजना राबवल्या,सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जातीजातींमध्ये फूट पाडणा-या आणि केवळ मत हवे, विकास नको अशी नीती असणा-या विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असेही यावेळी स्मृती इराणी बोलल्यात.