राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

0

मुंबई – हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५२ किमीपर्यंत वाढल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. या परिस्थितीत, मुंबईतील सखल भागांत पाणी साचण्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून, ठाणे-घोडबंदर रोडवरही वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली आहे.

राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट लागू आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

रेड अलर्ट : ४ ऑगस्ट – सातारा, पुणे आणि पालघर

ऑरेंज अलर्ट : ४ ऑगस्ट – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, ५ ऑगस्ट – सातारा

यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (३ ते ७ ऑगस्ट), कोल्हापूर (४ ऑगस्ट) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर (५ ऑगस्ट), रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा (६ ऑगस्ट)

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech