मलेशियाचे बेपत्ता विमानकृष्ण विवरात गडप झाले?

0

क्वालालुंपूर – १० वर्षांपूर्वी क्वालालुंपूरहून बीजिंगला निघालेले मलेशिअन एअरलाईन्सचे एमएच ३७० विमान अचानक बेपत्ता झाले होते. या विमानातून आपण संकटात असल्याचा किंवा मदत हवी असल्याचा संदेश मिळाला नव्हता. या विमानामध्ये २३९ प्रवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या विमानाचा शोध अजूनही लागलेला नाही. या विमानाचे अवशेष किंवा विमानातील प्रवासी, कर्मचाऱ्यांचे मृतदेह देखील सापडले नाहीत. मलेशिया आणि व्हिएतनामदरम्यान हे विमान एखाद्या कृष्णविवरात गडप झाले असावे, असा नवा तर्क काही हवाई तज्ज्ञांनी मांडला आहे.

८ मार्च २०१४ रोजी मलेशिअन एअरलाईन्सच्या विमानाने बीजिंगच्या दिशेने उड्डाण केले. विमानाच्या उड्डाणानंतर ३८ मिनीटांनी वैमानिकाचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी शेवटचे बोलणे झाले. मात्र त्यानंतर हे विमान अचानक बेपत्ता झाले. विमानाचा शोध घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु होता. १५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चदेखील करण्यात आला. मात्र तरीही या विमानाचा शोध लागला नाही.

माजी हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक जीन ल्युक मार्धड आणि निवृत्त वैमानिक पेंट्रिक ब्लेली यांनी सांगितले की, एमएच ३७० हे विमान आता बेपत्ता झाले असून, त्याचा कधीही शोध लागू शकत नाही. जिथे हे विमान बेपत्ता झाले तो भाग कालालपूर आणि व्हिएतनाममधील कृष्णविवरासारखा आहे. या विमानातून आपण संकटात असल्याचा किंवा मदत हवी असल्याचा संदेश मिळाला नव्हता. तसेच या विमानाचा निर्धारित मार्ग बंद करण्यात आला होता. हे विमान त्यानंतर ७ तास उडत होते. या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क मानवी पद्धतीने बंद करण्यात आला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech