मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – खा. अशोक चव्हाण

0

नांदेड : महाराष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सर्वानी मिळून काम करणे गरजेचे आहे. उपेक्षित वर्गाला कायदेशिर मार्ग काढून टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. वंचित घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करुन प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल, असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच शासन स्तरावर नांदेडच्या विकास कामाबाबत मागणी केली असून याबाबत लवकरच शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल ,असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच महाराष्ट्रात मागासलेल्या मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व आमदार महोदयांनी नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांना त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांचा धनगर समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech