नवी दिल्ली – उन्हाने त्रस्त झालेल्या आणि शेतीची मशागत करून वरून राजाची वाट पाहणाऱ्या बळीराजांसाठी आनंदाची बातमी हवामान विभागाने दिली आहे. दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली.
मान्सून केरळमध्ये दाखल झाली असून पुढील १० दिवसांनी मान्सून महाराष्ट्रातही दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रेमल चक्रवादळाचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नाही, अशी माहिती नागूपर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी दिली आहे.