एमपीएससी परीक्षा आता २५ ऑगस्टला

0

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शुद्धीपत्रक काढून मराठा उमदेवारांना ‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करता यावा, यासाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ती २५ ऑगस्टला होणार आहे. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोन वेळा शुद्धीपत्रक काढल्यानंतरही केवळ ८,३०८ उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात (एसईबीसी) अर्ज केला होता. प्रमाणपत्राअभावी शेकडो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज खुल्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात असल्याने भविष्यात कायद्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढून मराठा उमदेवारांना ‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करण्याची संधी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech