अहमदनगर – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये जैन धर्माची देशातील १० व राज्यातील ३ तीर्थांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री व राज्यसरकारचे पारनेर तालुका जैन महासंघाचे उपाध्याक्ष प्रसाद कर्नावट व जैन समाजाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री व राज्यसरकारचे आभार मानले आहेत.
जैन धर्मियांसाठी पूजनीय व श्रद्धेय अशा श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्रासह देशातील १० व राज्यातील ३ जैन धर्मियांच्या तीर्थस्थळांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे.प्रथमच जैन धर्मियांना अशा प्रकारचा लाभ शासनाकडून प्राप्त होणार असल्याने जैन धर्मियांतून आनंद व्यक्त केला जात आहे.विविध सामाजिक जैन संघटना,संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाचे सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.महाराष्ट्रातील सर्व धर्मियां साठी ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकां ना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी राज्य शासनाकडून करण्यात आलीअसुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १४ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला.
त्यात भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ विविध धर्मियांच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.आयुष्यात एकदा तरी पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्राला जाण्याची सुप्त इच्छा असते.जैन समाजाचे १० तीर्थस्थांचा समावेश तीर्थ दर्शन योजनेमध्ये श्री सम्मेद शिखरजी (गिरीडीह) झारखंड,पावापुरी-बिहार, गिरनार-गुजरात,उदयगिरी-मध्य प्रदेश,दिगंबर जैन लाल मंदिर दिल्ली,रणकपूर-राजस्थान,गोमटेश्वर-श्रवणबेळगोळ,महाराष्ट्रा तील जैन मंदिर-कुंभोज,जैन मंदिर एलोरा लेणी-छत्रपती संभाजीनगर,जैन मंदिर मांगीतुंगी(जिल्हा नाशिक) हे राज्य शासनाने आपल्या योजनेत जैन धर्मीयांच्याची तीर्थस्थळांचा समावेश केलाआहे.
जैन धर्मियांना प्रथमच अशा यात्रे च्या माध्यमातून शासनाकडून धर्मयात्रेचा लाभ होणार आहे.त्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व राज्यसरकाचे मनापासुन आभार मानले.