सिद्धीविनायक मंदिर सुशोभीकरणाला, पाचशे कोटींचा निधी

0

मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी श्री सिद्धीविनायक सुशोभिकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी. या कामाचा आरंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभिकरण व सोयी-सुविधांसंदर्भात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.

श्री सिद्धीविनायक सुशोभिकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यात्रीनिवास, मंदिराच्या परिसरात पाच किलोमीटरच कॉरिडॉर, दुकाने, पार्किंग, भाविकांसाठी दर्शनरांग त्यातील सुविधा आदी विविध बाबीसंदर्भात सादरीकरणात माहिती देण्यात आली. या कामांच्या संदर्भात तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करून, येणाऱ्या गणेश चतुर्थीला कामांचा आरंभ करता येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech