नागपूर दंगलीतील जखमीचा रुग्णालयात मृत्यू

0

नागपूर : नागपुरात १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीत जखमी झालेल्या इसमाचा आज, शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अन्सारी असे त्याचे नाव असून तो नागपुरातील गरीब नवाज नगर परिसरातील रहिवासी होता. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. यासंदर्भातील माहितीनुसार इरफान अन्सारी दंगलीत जखमी झाला होता. त्याच्यावर नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरू होता. गेल्या दोन दिवसापासून प्रकृती चिंताजनक होती. अशातच शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जखमी इरफान अन्सारी याचा मृत्यू झाला. यानंतर मेयो रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमा होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मेयो रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. तसेच सशस्त्र जवान सुद्धा या भागात तैनात केले आहे. यासोबतच मोमीनपुरा हंसापुरी चिटणीस पार्क चौक आणि भालदारपुरा यासह तहसील लकडगंज गणेश पेठ या भागात सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech