बांगलादेशात शेख हसीनांवरील खटले मागे ६ फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन

0

ढाका :  बांगलादेशात शेख हसीनांवरील गुन्हेगारी खटले मागे घेण्याची मागणीकरण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचा उद्देश केवळ शेख हसीना यांच्यावरील आरोप हटवणे नसून, बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणे आहे. मंगळवारी(दि. २८) रात्री पक्षाने आपल्या आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली. पक्षाच्या नेत्यांनी इशारा दिला की, जर प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाला आडकाठी आणली, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. बांगलादेशात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे.अशातच आता आणखी एक माहिती समोर येत आहे. आवामी लीगने 6 फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन, बंद आणि रास्ता रोको करणार असल्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी ५ ऑगस्टला झालेल्या तख्तापलटनंतर हे अवामी लीगचे पहिले मोठे आंदोलन असणार आहे. दरम्यान, बांंगलादेशात येत्या काही काळात निवडणुका होणार असून यामध्ये शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीगला निवडणुका लढवून दिल्या जाणार नसल्याचे युनूस सरकारने म्हटले आहे.यामुळे अवामी लीगल अधीकच संतप्त झाला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech