विधानसभेला राष्ट्रवादी 10 टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत

0

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाने 10 टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.अजित पवार गटाकडून सध्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. याबाबत प्राथमिक चर्चेनंतर मुंबईत चार आणि एमएमआर भागात आणखी एक, अशा पाच जागांवर मुस्लीम उमेदवार उभे केले जाणार आहेत. महायुतीत मुंबईत राष्ट्रवादीला चार जागा सुटणार असल्याची माहिती आहे. या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिम उमेदवार देणार आहे. तसेच प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देण्याची योजना अजितदादा गटाने आखली आहे.

विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाकडून मुंबईतील वांद्रे, मुंबादेवी, अणुशक्ती नगर आणि शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये मुस्लीम उमेदवार दिले जाणार आहेत. तर कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातही मुस्लीम चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. अणुशक्ती मतदारसंघातून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक, शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक, वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघातून नाजीम मुल्ला यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. तर मुंबादेवी मतदारसंघात अजितदादा गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech