आमदारकीसाठी नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले होते – विनायक पांडे

0

नाशिक : सन २०१४ मध्ये आमदारकीचे तिकीट मिळवून देते म्हणून तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या आणि आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले होते अशी स्पष्ट कबुली नाशिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी महापौर विनायक पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली असून याबाबत त्यांनी कोठेही तक्रार केली तरी त्यावर मी ठाम आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

दिल्ली येथील साहित्य संमेलनामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वरती आरोप करताना मातोश्रीला दोन मर्सिडीज कार दिल्यानंतर पद मिळत होते असा आरोप केला. त्यावरती सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतचा पुरावा देताना नाशिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे यांचे नाव घेतले होते. त्यावर भूमिका मांडताना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते माजी महापौर विनायक पांडे यांनी सांगितले की, आमची श्रद्धा ही मातोश्री वरती आहे. ठाकरे परिवारा वरती आहे त्याचा गैरफायदा घेऊन असे काही लोक आमच्याकडून पैसे मागतात आणि आम्ही ते देतो पण पण आज पर्यंत प्रत्यक्षात मला मातोश्री वरून कधीही पैशासाठी फोन आला नाही असे स्पष्ट करून विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांनी माझ्यासारखे अनेक जणांना फसविले असल्याचे देखील सांगितले आहे.

पैसे दिल्याबाबत पांडे पुढे म्हणाले की, १४ मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी मी आणि अजय बोरस्ते दोघांमध्ये तिकिटासाठी लढत होती. त्यावेळी नीलम गोरे यांचा कार्यकर्ता श्यामबाहेती यांनी नीलम गोरे यांच्याकडे नेले होते. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे तिकिटासाठी पैसे मागितले ते पैसे मी त्यांना दिले पण मला तिकीट मिळालं नाही असे स्पष्ट करून विनायक पाडे म्हणाले की, माझे पैसे मला मिळावे यासाठी म्हणून मी त्यांना हा सगळा प्रकार प्रसार माध्यमांकडून येईल असे सांगितले. त्यावेळी त्यांनी मला मुंबईत बोलवले आणि मनोरमा आमदार निवासा मध्ये त्यांच्या वाहन चालकाने मला पैसे आणून दिले त्यातही काही पैसे कमी होते ते मला अजून मिळालेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत मी कधीही उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवाराला याची माहिती दिली नाही पण माझ्या तिकिटासाठी माजी मंत्री विनायक पांडे आणि हेमंत गोडसे यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती, असेही त्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech