अयोध्येत पुजार्‍यांना नवा ड्रेसकोड पीतांबरी चौबंदी,डोक्यावर पगडी

0

अयोध्या– अयोध्येत राममंदिरातील रामलल्लाच्या पुजाऱ्यांना काल सोमवारपासून नवा ड्रेस कोड लागू झाला आहे.आता मुख्य पुजारी,४ सहाय्यक पुजारी आणि २० प्रशिक्षणार्थी पुजारी हे विशेष पोशाखात दिसतील.आत्तापर्यंत गर्भगृहातील पुजारी भगव्या रंगाच्या कपड्यात दिसत होते. त्यांनी डोक्यावर भगवा फेटा,कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. परंतु राम मंदिर ट्रस्टने यात बदल केला आहे. आता पुजाऱ्यांना पितांबरी म्हणजे पिवळ्या चौबंदी सोबत धोतर आणि डोक्यावर पगडी घालावी लागणार आहे.

राम मंदिराचे सहाय्यक पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी सांगितले की, राममंदिरातील पूजेत एकरूपता आणण्यासाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.याला ज्येष्ठ पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीही सहमती दर्शवली आहे.नवीन ड्रेसकोडनुसार,

संपूर्ण सफा पिवळ्या रंगाचा असेल .नवीन पुजाऱ्यांना या पगड्या परिधान करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. चौबंदी सोबत धोतर आणि त्याच रंगाची डोक्यावर पगडी राहील . पुजाऱ्यांना रामलल्लाच्या दरबारात अँड्रॉईड फोन घेऊन जाता येणार नाही

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech