देशात ‘सॅटेलाईट टोल कलेक्शन प्रणाली’ येणार- गडकरी

0

नवी दिल्ली – देशात वर्तमानात सुरू असलेली टोल प्रणाली बंद होणार आहे. त्याऐवजी देशात ‘सॅटेलाईट टोल कलेक्शन प्रणाली’ येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शुक्रवारी केली.

यासंदर्भात नितीन गडकरी म्हणाले की, सध्याची टोल प्रणाली बंद करत आहे. लवकरच सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन प्रणाली सुरू करण्यात येईल. याचा उद्देश, टोल कलेक्शन वाढवणे आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करणे असा आहे. राज्यसभेतही एका लेखी उत्तरात गडकरी म्हणाले होते की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) कार्यान्वित करणार आहे. मात्र, ही व्यवस्था सध्या केवळ काही निवडक टोल प्लाझांवरच सुरू होईल. यापुढे सॅटेलाइटच्या माध्यमाने टोल वसूल केला जाईल. आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि आपण जेवढे अंतर कापाल, त्यानुसार पैसे घेतले जातील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल असे गडकरी यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech