मुंबई : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे राज्याच्या वतीने राजभवन येथे स्वागत केले. यावेळी बैठकीत हरित ऊर्जा, क्रीडा, शिक्षण, कृषी तंत्रज्ञान, मत्स्यपालन, यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी आयोजित स्नेहभोजन समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.