निवडणुकीदरम्यान कार्तिकी यात्रेसाठी वारकरी असणार आळंदीच्या वाटेवर

0

पुणे- संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा अर्थात कार्तिकी यात्रा ही कार्तिक वद्य अष्टमी अमावास्या 1 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर असणार आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला लाखो वारकरी मुकणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

अष्टमीला गुरुवर्य हैबतबाबा पायरीपूजनाने कार्तिक यात्रेला प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिंड्या सुमारे 10 दिवस ते 15 दिवस अगोदरच आपल्या गावावरून निघत असतात. विशेषतः मराठवाड्यातून येणार्‍या दिंड्या लवकर प्रस्थान करत असतात. त्यामुळे 20 नोव्हेंबरच्या मतदानादिवशी शेकडो दिंड्यांतील लाखो वारकरी आळंदीकडे येत असतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech