नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 136 कृत्रिम विसर्जन स्थळे याठिकाणी दीड दिवसांच्या श्रीगणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला असून नागरिक महानगरपालिकेने केलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. आयुक्तांनी केलेल्या इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाच्या आवाहनास अनुसरून नागरिक विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन स्थळांना पसंती देत असून नवी मुंबईचा पर्यावरणशील शहर म्हणून नावलौकिक उंचावत आहेत.