पुणे : शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आयोजित आढावा बैठकीत सुळे बोलत होत्या. एकवेळ मी विरोधात बसेन, परंतु मी नैतिकता सोडणार नाही, असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते जर या पक्षात असते तर मी या पक्षात नसते, त्यामुळे बरे झाले पक्ष फुटला. त्यांनी केलेल्या या प्रकारानंतरच खरी लढाई सुरू झाली. यावर मी आज पहिल्यांदा बोलले आहे. मला नको ते ठेकेदारांचे पैसे. त्यावर माझे घर चालत नाही. बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.